नवभारत साक्षरता अभियानवर बहिष्कार असल्याचे पत्र गशिअ सुभेदार यांना देताना शिक्षक संघटनांचे पदाधिकारी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
शासनाच्या वतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर नवभारत साक्षरता अभियान हे अशैक्षणिक काम गेल्या काही महिन्यापासून लादण्यात आले आहे. राज्यभर सर्वेक्षणातून निरक्षर पुरुष, महिला शोधून त्यांना साक्षर करायचे असे या अभियानाचे स्वरूप आहे. या अभियानाच्या कामकाजावर राज्यस्तरावरून मध्यवर्ती समन्वय संघटनेच्या वतीने बहिष्कार घातला आहे. या अनुषंगाने चंदगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना समन्वय समितीने आपला बहिष्कार सुरू असल्याचे जाहीर केले असून नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमातून जिप. प्राथमिक शिक्षकांना यातून कायमस्वरूपी वगळून इतर यंत्रणांकडे हे काम द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. हे पत्र नुकतेच गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवाजी पाटील, सदानंद पाटील, धनाजी पाटील, रवींद्र साबळे, सट्टूपा फडके, बाबुराव परीट, अशोक नौकुडकर, मनोहर नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर शिक्षक संघ आम. शिवाजीराव पाटील गट, संभाजी थोरात गट, शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment