नांदवडे येथील सुधाकर पाटील यांची भाजपा पश्चिम ग्रामीण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

नांदवडे येथील सुधाकर पाटील यांची भाजपा पश्चिम ग्रामीण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवड

 

भाजपा पश्चिम ग्रामीण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवडीचे पत्र देताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील, सोबत गजानन गावडे व इतर सहकारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नांदवडे (ता. चंदगड) येथील सुधाकर पाटील यांची भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा पश्चिम ग्रामीणच्या जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पश्चिमचे धीरज करलकर यांच्या सहीचे निवडपत्र देण्यात आले. 

       भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून आपला पक्ष विस्ताराचे काम यशस्वी करण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष वाढीसाठी तसेच सशक्त संघटन निर्माण करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. पक्ष बांधणी मजबूत करून प्रभावी कार्याद्वारे आपले गाव तालुका व जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याच्या उद्देशाने त्यांनाही जबाबदारी देण्यात आल्याचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले. 

No comments:

Post a Comment