चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील लिंगनाथ महिला दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रचना रामचंद्र प्रभू तर उपाध्यक्षपदी शीतल सुंदर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एम. बंके यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालकामध्ये रत्नमाला येर्लेकर, पूजा बिरजे, संजना गावडे, रंजना गावडे, अश्विनी गावडे , लक्ष्मी रेडकर , सरस्वती शिंदे , भाग्यश्री पाटील यांचा समावेश आहे . ही निवड आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून निवडीच्यावेळी गोविंद अमृस्कर , पुंडलिक पाटील , काशिनाथ बिरजे ,उपसरपंच अंबादास पाटील , सागर पाटील , अनिल मोरे , रवींद्र बिरजे , रामचंद्र प्रभू उपस्थित होते . आभार सचिव संतोष अमृस्कर यांनी मानले .
No comments:
Post a Comment