ऑनलाईन वृत्त
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील १६ हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेचे २ हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपये आज बुधवारी राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ई-केवायसी किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाहीत.
No comments:
Post a Comment