चंदगड येथील रवळनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ, रविवारी होणार सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

चंदगड येथील रवळनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ, रविवारी होणार सांगता

श्री देव रवळनाथ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील ८४ खेंड्याचे  ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवालयाच्या वार्षिक यात्रोत्सवाला बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सुरवात होत आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आले आहे. यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दि. २८ फेब्रुवारी असला तरी मंगळवार दि. २७ ते ३ मार्च अखेर अशी सहा दिवस यात्रा चालणार आहे. चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री देव रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरू होत असून मंदिर परिसराबरोबर देवदेवतांच्या मूर्तीची स्वच्छता, यात्रोत्सवकाळात लावण्यात येणारी दुकाने, पाळणे व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रवळनाथ देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून श्री देव रवळनाथ यात्रोत्सवानिमित्त मंगळवार दि. २७ रोजी लघुरूद्र, अभिषेक, गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंधळाची आरती, बुधवार दि. २८ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस, महाआरती, पालखी, सासनकाठी, गुरूवार दि. २९ रोजी देव चाळोबा यात्रा, दि. १ मार्च रोजी देवी सातेरी, भावेश्वरी यात्रा, शनिवार दि. २ रोजी मारूती, म्हारताळ, श्री देवी ईठलाई यात्रा, रविवार दि. ३ रोजी रवळनाथाच्या जुन्या हरक्या फेडणे यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार असून भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवळनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव सुरेश सातवणेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment