चंदगड / प्रतिनिधी
वरगाव पैकी बेरडवाडा (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी व सध्या मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल पदी कार्यरत असलेल्या कु. सुवर्णा मुतकाप्पा नाईक यांनी बेरडवाडा प्राथमिक शाळेला स्पीकर संच भेट दिला. त्यांचे वडील मुतकाप्पा नाईक यांनी एका शालेय कार्यक्रमात मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांचेकडे सुपूर्त केला.
ज्या गावाने व शाळेने मला घडविले-वाढविले त्या गावचे व शाळेचे ऋण व्यक्त करणेचा एक छोटासा प्रयत्न असलेचा व यापुढेही माझे शाळेला व गावाला सहकार्य असेल, असा शुभसंदेश कु. सुवर्णा नाईक यांनी दिला. नाईक कुटूंबियांने दिलेला मल्टिपर्पज स्पीकर संच शालेय परिपाठ, विद्यार्थी वक्तृत्व व कलागुणांना वाव देणेस मोलाचा ठरेल असे सांगितले. यावेळी दाटे-वरगांव ग्रामपंचायतचे उपसरपंच किरण नाईक, शालेय कमिटी सदस्य सागर नाईक, शालेय कमिटी अध्यक्ष महादेव नाईक, उपाध्यक्षा सौ. संजिवनी नाईक यांनी आपल्या मनोगतातून शाळेला दिलेल्या भरीव देणगी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुरज नाईक, माजी शालेय कमिटी अध्यक्ष तुलसिराम नाईक, सहदेव नाईक यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार विलास सुतार यांनी मानले.
No comments:
Post a Comment