स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे - स्वाती कोरे, गडहिंग्लज येथे सक्षम स्किल्स इन्स्टिट्यूट कडून मोफत प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2024

स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे - स्वाती कोरे, गडहिंग्लज येथे सक्षम स्किल्स इन्स्टिट्यूट कडून मोफत प्रशिक्षण

प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रसंगी स्वाती कोरी, सौ सुप्रिया चौगुले सुनिता पाटील आधी 

गडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा 

       सक्षम स्किल्स इन्स्टिट्यूट गडहिंग्लज यांचे मार्फत रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योगता अभियानांतर्गत 'मेकअप आर्टिस्ट' या कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत असून महिलांसाठी व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग असलेले हे प्रशिक्षण तीन महिने चालणार आहे. लवकरच 'कस्टमर केयर एक्झिक्युटिव्ह' हा कोर्स सुरू होणार असून त्याचेही ॲडमिशन फुल्ल झाले असून सर्व कोर्ससाठी गडहिंग्लजकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची माहिती इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापिका सौ. प्रिया अमित चौगुले यांनी उद्घाटन प्रसंगी दिली. 

प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या महिला प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना मान्यवर

       आर्थिक गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर केवळ पुरुष आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन चालणार नाही तर त्याच्या जोडीला स्त्री सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी तिने उद्योग, व्यवसाय, नोकरीकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केले. याकामी संजय माळी (सहायक आयुक्त) व श्रीमती विद्या धुमाळ  (वरिष्ठ लिपिक) जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

     आजाद रोड, संकपाळ मेडिकलच्या समोर, गडहिंग्लज येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन स्वाती कोरी, माजी नगरसेविका सुनीता पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रेया आजरी, रामचंद्र मगदूम, सौ. काटकर, संध्या बुजरे, अर्चना कोरे, हरीश पाटील आणि प्रशिक्षणार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment