छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवनाला प्रेरणा देतो - प्रा. डॉ. मधुकर जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2024

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवनाला प्रेरणा देतो - प्रा. डॉ. मधुकर जाधव

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे युवक या विषयावर आपले विचार व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे येणाऱ्या संकटावर मात करून आपल्या यशाचा इतिहास निर्माण करा इतिहासकालीन संदर्भ व दाखले देत त्यांनी युवकांच्या कार्यक्षमतेला दिशा देण्याचे आणि स्वयंप्रेरीत  होण्यासाठी प्रा.डॉ मधुकर जाधव यानी मार्गदर्शन केले". तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महादेवराव बी एड कॉलेज तुर्केवाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे युवक या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक महादेव वांद्रे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अनिता चेतन घाटगे (कोल्हापूर)  होते. या वेळी कु.अन्वी चेतन घाटगे या जागतिक गिर्यारोहक हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         सौ. अनिता घाटगे यांनी "शिवाजी महाराजांच्या आजच्या रणरागिनी व युवा मावळ्यांनी गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम चळवळ कार्यरत ठेवण्याचे महत्त्व प्रतिपादित केले.कु. अन्वी घाडगे हिने बालवयात गिर्यारोहक होऊन प्रत्येक विक्रम आपल्या नावे करण्यामागे शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेचे स्पष्ट केले".उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी  विविध क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केलेबद्दल गौरव करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात श्री.वाद्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून यश संपादनासाठी प्रामाणिक मेहनत करावी असे मत व्यक्त केले. 

      या वेळी संचालक  गोपीनाथ गवस,उमर पाटील, सौ मृणालिनी वांद्रे, प्राचार्य एम सी महंतेश, पॉलिटेक्निकचे प्राचार्य  संतोष गावडे, बी एडचे प्राचार्य एन जे कांबळे, प्रा.ग गो प्रधान, एस आर देशपांडे यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. ग.गो. प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी कांडर व विद्या पाटील यांनी केले. आभार एन जे कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment