माती परीक्षण काळाची गरज : कृषी अधिकारी अनिकेत माने, म्हाळेवाडी येथे बळिराजा हिताय कार्यक्रमा अंतर्गत ' माती परीक्षण जनजागृती' - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2024

माती परीक्षण काळाची गरज : कृषी अधिकारी अनिकेत माने, म्हाळेवाडी येथे बळिराजा हिताय कार्यक्रमा अंतर्गत ' माती परीक्षण जनजागृती'

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेऊन आपल्या जमिनीचा पोत सुधारावा व भरपूर भरघोस उत्पन्न घ्यावं असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत म्हाळेवाडी येथे बळीराजा हिताय कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील उपस्थित होते. 

           रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. एस. बागवान यांनी या कार्यक्रमाची भूमिका व उद्देश व माती परीक्षणाचे महत्व आपल्या प्रास्ताविकातून विशद केले. सर्वप्रथम माती परीक्षण बद्दल जनजागृती करण्यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्वेक्षण केले.  त्यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी अनिकेत माने कृषी पर्यवेक्षक एसडी खुटवड, ग्रामसेविका श्रीमती जाधव, उपसरपंच श्री. मर्नहोळकर, ग्रामपंचायत सदस्या अनिता पाटील, शांता नांदवडेकर, कल्पना पाटील,  कृषी पर्यवेक्षक श्री. कुंभार, कृषी सहाय्यक एस. डी. मुळे, प्रा. ए. एस. जाधव, प्रा. मनोज जांबोटकर, प्रा. सुप्रिया यादव, प्रा. किर्ती मोरे व आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

       डॉ. एस. एम. सुतार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. ए. पाटील यांनी स्वागत केले. कृषी पर्यवेक्षक एस. डी. खुटवड यांनी माती परीक्षण संदर्भात मार्गदर्शन केले व मातीचा नमुना कसा घ्यायचा याविषयीची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. अशा कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे आणि आपल्याला जी माहिती हवी आहे. ती माहिती जाणून घेतली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सी. ए. पाटील यांनी व्यक्त केले. 

       कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर दौलत विश्वस्थ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. ग्रामपंचायत सदस्या अमृता कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. आभार प्रा. ए. एस. जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment