विवेक पाटील यांची मनसेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विवेक विठ्ठलराव पाटील यांची फेर निवड करण्यात आली आहे. कोवाड (ता. चंदगड) येथील विवेक पाटील गेली तीन वर्षे हे पद सांभाळत होते. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम विवेक पाटील यांनी गेल्या दोन-तीन वर्षात निष्ठेने व प्रामाणिकपणे केल्यामुळे त्यांची या पदावर फेर निवड करण्यात आली आहे. हे कार्य समाजाला कोणत्याही प्रकारचा उपक्रम होणार नाही अशा पद्धतीने अधिक जोमाने यापुढेही चालू ठेवावे याबद्दल त्यांना शुभेच्छा व निवड पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, सरचिटणीस व कोल्हापूर लोकसभा संघटक बाळा शेडगे, उपसंघटक जयराज लांडगे, नरेंद्र तांबोळी आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांसह चंदगड तालुक्यातील मनसैनिकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment