चंदगड / प्रतिनिधी
पंचायत समिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत चंदगड तालुक्यातील ५७ अंगणवाडी मध्ये मदतनीस पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १६.०२.२०२४ ते दिनांक ०४/०३/२०२४ दरम्यान इच्छुक उमेदवारांनी चंदगड एकात्मिक बालविकास कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातवणे , मलगेवाडी खु . , पडतेवाडी ( कानडी ) , पाटीलवाडा ( केरवडे ) , मो - याचीवाडी , रायाचीवाडी , बुझवडे , मजरे शिरगांव , कानुर धनगरवाडा , काजिर्णे धनगरवाडा , अपुटहोळवाडी , इलगेवाडी ( गवसे ) , बामणकीवाडी , चुरणीचावाडा , पेडणेकरवाडी , खळणेकरवाडी , सावताचीवाडी , पाटीलवाडा ( असगांव ) , श्रीपादवाडी माळी , गावडेवाडा , कोनेवाडी , पाटणे , कलिवडे धनगरवाडा , गवळीवाडा , नविन वसाहत किटवडे , पारगड , रांयदेवाडी ,नामखोल , बांद्राई , मालुसरेवाडी , हेरे , नगरगांव , किटवडे , तेऊरवाडी , गणेशवाडी , दिंडलकोप , किटवाड , कमलवाडी , राजेवाडी , तिरमाळ , नरगटटे , यर्तेनहटटी , दुंडगे , शिवणगे , बागीलगे , पाटणे फाटा , तुडीये , म्हाळुंगे खा ( गोधनगरवाडा ) , शिनोळी खुर्द शिनोळी बु . , मांडेदुर्ग , वैतागवाडी , जंगमहटटी (धनगरवाडा) , सुपे , मुटरकुटेवाडी व मौजे कारवे ता. चंदगड , जि. कोल्हापूर महसुली गावा अंतर्गत " अंगणवाडी मदतनिस "मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणेत येत आहेत. " अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १६.०२.२०२४ ते दिनांक ०४/०३/२०२४ पर्यत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचा दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात , अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना बाल विकास प्रकल्प कार्यालय चंदगड येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर भरती प्रक्रीयेचे व निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार तालुका निवड समिती, चंदगड यांनी राखून ठेवला आहेत.
No comments:
Post a Comment