मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राजगोळी खुर्द हायस्कूल प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राजगोळी खुर्द हायस्कूल प्रथम

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राजगोळी खुर्द हायस्कूल प्रथम

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द शाळा माध्यमिक विभागात चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक विजेती ठरली आहे. कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्था संचलित या विद्यालयाला शासनाकडून तालुकास्तरीय तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार असून विद्यालयाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    महाराष्ट्र शासन पुरस्कृत या स्पर्धेत तालुक्यातील ६७ माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. तालुकास्तरीय परीक्षण कमिटीने शाळा इमारत, क्रीडांगण, भौतिक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, शालेय परिसर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने राबवलेले अनेक उपक्रम, लोकसहभाग आदी सर्व बाबींची दखल घेऊन शाळेची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

         याकामी  मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर, शिक्षक आर. जी. इनामदार, बी. बी. पाटील, के. ए. पाटील, एम. जे. पाटील, एम. पी. तोंडले, बसवानी भोसले, शिवाजी कडोलकर यांनी  परिश्रम घेतले. चेअरमन ए. डी. शिरोटे, व्हॉ. चेअरमन आदगोंडा पाटील, सेक्रेटरी सातगोंडा पाटील, खजिनदार आण्णासो चुडाप्पा व संचालकांचे मार्गदर्शन तर  शाळा व्यवस्थापन समिती, सर्व तरुण मंडळे व राजगोळी खुर्द ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment