नेसरीतील आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद, १०२ गरजूंनी घेतला लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

नेसरीतील आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद, १०२ गरजूंनी घेतला लाभ

 


नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

     येथील स्वर्गीय मल्लाप्पा उर्फ आप्पासाहेब फुकेरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील श्री ऑप्टीशियन व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल  कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास चांगला मिळाला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा एकूण १०२ गरजूनी  लाभ घेतला. विशेष म्हणजे आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधे व चश्मे वितरित करण्यात आले. येथील व्ही. के. चव्हाण विद्यालयात हे शिबिर संपन्न झाले.

      डॉ. सुदेश कुमार मुळीक, डॉ. किरण पाटील, डॉ. दिग्विजय पाटील व सुदाम हरेर यांच्या टीमने रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी हरेर यांनी मोतीबिंदू झालेल्या रुगणांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे जाहीर केले.

    प्रारंभी स्व. हुक्केरी यांच्या प्रतिमेचे पूजन अजितसिंह शिंदे नेसरीकर यांच्या हस्ते होउन शिबिरास प्रारंभ झाला. शशिकांत हुक्केरी यांनी प्रास्तविक करून वडील मल्लापा हुक्केरी यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागत जयश्री वळगडे यांनी केले. यावेळी भिकाजिराव दळवी, महादेव साखरे, वसंतराव पाटील, शिवाजीराव हिडदुगी, विश्वनाथ रेळेकर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment