शिवराजमध्ये मनस्पर्शी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
चंदगड / प्रतिनिधी
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील रहिवासी व सध्या शिवराज कॉलेजमध्ये बी.फार्मसी शिक्षण घेणारी कौशल्या जानबा अस्वले या विद्यार्थिनीने लिहीलेल्या " मनस्पर्शी " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेजच्या कार्यक्रमात झाले.
या कवितासंग्रहाचे प्रकाशन शिवराज शिक्षण संकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर, ॲड दिग्विजय कुराडे, विश्वजीत कुराडे, डॉ. राहुल जाधव, हडलगेचे सरपंच हणमंत पाटील, कालकुंद्रीचे साहित्यिक के. जे. पाटील, वडील जानबा अस्वले, रंजना अस्वले यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन कार्यक्रमाला डी. फार्म व बी.फार्मचे शिक्षक यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment