शिवाजीराव पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील तरुण, तरुणींसाठी विविध कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शिवाजीराव पाटील युवा मंच व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने या भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नामवंत अशा ७५ कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहून आपणास हव्या त्या उमेदवारांची निवड करून कंपनीतील नोकरीत सामावून घेणार आहेत.
रविवार दि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे हा नोकरी महोत्सव पार पडणार आहे. चंदगड तालुक्यात शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून इतक्या व्यापक प्रमाणात नोकरी महोत्सवाचे प्रथमच आयोजन होत असल्याने उपविभागातील सर्वच युवा वर्गाचे लक्ष या उपक्रमाच्या यशस्वीतेकडे लागले आहे. महोत्सवात manufacturing, electrical, automobile, banking, sales, KPO/ BPO, marketing, hotel industry, retail industry, pharmaceuticals, security, information and technology (IT) आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नोकरीसाठी इच्छुक तरुण-तरुणींनी आपल्या बायोडेटा (resume) व इतर आवश्यक कागदपत्रांच्या किमान ५-५ प्रतिंसह मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी ९.०० वाजता उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यात नाव नोंदणीसाठी या 9221115111 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा खाली दिलेला 'क्यू आर कोड' स्कॅन करून आपले नाव नोंद करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाजीराव पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या भव्य अशा रोजगार मेळावा तथा नोकरी महोत्सवाचे विविध स्तरातून कौतुक होत असून तालुका व परिसरातील युवकांनी याचा लाभ घेऊन मेळावा यशस्वी करावा असा सूर सर्वसामान्य लोकांतूनही व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात ७ फेब्रुवारी रोजी माडखोलकर महाविद्यालय चंदगड व कला महाविद्यालय कोवाड तर ८ फेब्रुवारी रोजी कोलेकर महाविद्यालय नेसरी व हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी (ता गडहिंग्लज) येथे मुलाखत पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment