व्ही पी देसाई जुनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ विनोद कोकितकर (एमडी मेडिसीन) विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना, सोबत प्राचार्य कदम व अन्य
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात मुलामुलींना लठ्ठपणा, नेत्रविकार, मधुमेह यासारखे आजार जडत आहेत. हे टाळण्यासाठी मोबाईलचा अतिवापर, चायनीज व तत्सम अन्नपदार्थ खाणे टाळून पुरेसा चौरस व पोषक आहार घ्यावा. सांघिक व मैदानी खेळ खेळावेत, व्यायामासाठी वेळ द्यावा. असे प्रतिपादन डॉ विनोद सोनाप्पा कोकितकर ( बुक्कीहाळ बुद्रुक) यांनी केले. ते कोवाड (ता. चंदगड) येथे श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आहार विषयक मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस. टी. कदम हे होते.
स्वागत उपप्राचार्य एस. एम. माने यांनी केले, प्रा. ए. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कोकितकर यांनी मुलांमध्ये बळवणाऱ्या लठ्ठपणा, नेत्रविकारांसह विविध आजारांची माहिती सांगून ते टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती दिली. या कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ कोकितकर यांनी नुकतीच एमडी मेडिसिन पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा शाळा व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यापक बी. एस. तरवाळ, ए बी घोडके, एस. पी. हल्लीकर, अनंत भोगण, एम. व्ही. पाटील, सुनील कांबळे, एन. आर. कुंभार, एम. जी. पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment