चंदगड / प्रतिनिधी
बौद्धिक संपदा म्हणजे आपल्या मालमत्तेचे अधिकार समजून घेणे होय. आपली मालमत्ता, त्याला असलेले वेगवेगळे संदर्भाचे निशाण, ट्रेडमार्क ,पेटंट, कॉपी राईट ,हक्क, या सर्व गोष्टीत आपली बौद्धिक संपदा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या उद्योग व्यवसायातील खुणा ,काही काही गोष्टींची ठराविक निशाणी आणि त्याचा असलेला अधिकार या सर्व गोष्टी गोष्टींचा अर्थ बौद्धिक संपदा होय." असे प्रतिपादन प्रा.विजय घोडके यांनी केले. दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे आयपीआर व आयक्यूएसी अंतर्गत उपक्रम "बौद्धिक संपदा" या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी. डी.अजळकर होते.
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. प्राचार्य डॉ.बी. डी. अजळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कमिटी प्रमुख प्रा. पी.ए. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . यावेळी नक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. एस. आर .वायकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
No comments:
Post a Comment