चंदगड तालुक्यात तीन मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2024

चंदगड तालुक्यात तीन मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम



चंदगड / सी एल वृत्तसेवा

    रविवार दिनांक 3 मार्च रोजी चंदगड तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ  यांनी  दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम बाबत प्रशिक्षण पार पडले, यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवर. 
    सदर मोहिमेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब तोंडावाटे पाजले जाणार आहेत. चंदगड तालुक्यामध्ये एकूण ० ते ५ वर्षे वयोगटातील 14785  एवढ्या बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब तोंडावाटे पाजले जाणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीत, एसटी स्टँड, इत्यादी ठिकाणी मिळून एकूण  172 एवढे बूथ आयोजित केलेले आहेत. सदरील सर्व बूथ सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कार्यान्वित राहतील.
उपस्थित आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस

     याचबरोबर ऊसतोड मजूर, व इतर भटके मजूर यांच्या लाभार्थ्यांना पोलिओ लस देण्यासाठी विशेष पथके कार्यान्वित केलेली आहेत. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील सर्व आशा, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, व समुदाय आरोग्य अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.
    रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये आपल्या घरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना आपल्या गावातील पोलिओ लसीकरण केंद्रावर पोलिओचे दोन थेंब पाजून घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. असलम नाईकवाडी, डॉ. सुधाकर पाटील, डॉ. मुसांडे, डॉ. ईलन देवन, डॉ. चिवटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment