सुरेश रुक्माणा देवण |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता चंदगड) येथील सुरेश रुक्माणा देवण यांचे आकस्मित निधन झाले. ते सर्वोदय शिक्षण संस्था कोवाडचे संस्थापक संचालक आणि खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले.
खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री या संस्थेच्या मांडेदूर्ग, शिवणगे, कालकुंद्री व चंदगड या शाखेत शिक्षक म्हणून काम केले. दि न्यू इंग्लिश स्कूलचे चंदगड येथे पर्यवेक्षक म्हणून २०२० साली सेवा निवृत्त झाले.
नागरदळे गावातील शिक्षकी पेशा असणार्या तिन्ही भावांचे हे एक आदर्श एकत्र कुटुंब आहे. सर्वांची मुले उच्चशिक्षित असून या कुटुंबाचे ते सर्वार्थाने प्रमुख होते. खेडूत शिक्षण संस्था, सर्वोदय शिक्षण संस्था याच्या कार्यकारिणीत काम करीत असताना गावच्या विकासात पण ते माजी उपसरपंच या नात्याने कार्यरत होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी विवाहीत मुलगा,सुन, मुलगी, जावई, २ भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अपरिमित हानी झाली आहे.
No comments:
Post a Comment