चंदगडला रविवारी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2024

चंदगडला रविवारी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव

 

चंदगड/ प्रतिनिधी
       'चंदगड येथील गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव रविवार दि.३ मार्च रोजी रामलिंग मंदिर शेजारी बाबा गार्डनच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्यात आला आहे . यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.३ रोजी सकाळी अभिषेक, महापूजा, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. ज्या भक्तांना उत्सवासाठी तांदुळ किंवा इतर काही साहित्य देणगी रूपाने स्विकारले जाईल. सर्व गजानन महाराज भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment