तेऊरवाडी येथील मराठी विद्यामंदिर मध्ये शतक महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2024

तेऊरवाडी येथील मराठी विद्यामंदिर मध्ये शतक महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रम

तेऊरवाडी येथे माजी विद्यार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करताना आर. जे. पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर  शतक महोत्सव निमित माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. जे. पाटील होते.       

       मराठी विद्या मंदिर तेऊरवाडी  या शाळेची स्थापना १९२६ साली झाली आहे. पुढील वर्षापासून शतक महोत्सव साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. त्यानिमित दोन वर्ष विविध कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात येणार आहेत .तसेच शाळेची नवीन इमारत बांधण्याचा संकल्प करण्यात आला. आज १९६६ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा गावातून सवाद्य मिरवणूक काढत सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमावेळी सरपंचा  सौ. मनिषा पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, प्रा. एन. एस. पाटील, वाय. बी. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील,  जनार्दन पाटील, मुख्याध्यापक संतान लोबो, बी. एम. पाटील, श्रीकांत पाटील, प्रकाश दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 1966 पर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रियांका पाटील, सदस्य नारायण पाटील, लक्ष्मण भिंगुडे, रेखा भिंगुडे, शोभा गिरी, सुनिता चव्हाण, सारिका पाटील, अध्यापक जयवंत जाधव, विश्वनाथ मनवाडकर, संतोष सुर्यवंशी,  लता पाटील, सुनिता राजगोळकर आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment