कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अद्यापन कार्यगौरव पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2024

कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अद्यापन कार्यगौरव पुरस्कार प्रदान

 

प्रा. डॉ. आर. डी. कांबळे

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांना ज्ञानज्योती बहुद्द्देशीय संस्था टाकळीभान श्रीरामपूर  (जि. अहमदनगर) येथील  राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अद्यापन कार्यगौरव पुरस्कार मराठी राजभाषादिनी घेण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी ग्रामीण संमेलनात नुकताच  प्रदान करण्यात आला आहे.

        डॉ. कांबळे गेली २६ वर्ष मराठी भाषेची निरंतर सेवा प्रचार आणि संशोधन कार्य करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी भाषा, बोली, संस्कृती, सामाजिक विषयी मार्गदर्शनपर, प्रबोधनपर व्याख्याने केली आहेत, विद्यापीठ, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या परिषदा, कार्यशाळा, संमेलन, चर्चासत्रातून समाज, भाषा, संस्कृती, बोली, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, लोकसंस्कृती आदी विषयी  शोधनिबंध, सादर केले आहेत. तसेच अनेक विद्वत् शोध पत्रिकेत त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.

     सामाजिक,  शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत असून  शिवाजी विद्यापीठाचे पी. एच. डी. च्या मराठी विद्यार्थाना मार्गदर्शक म्हणून ते काम करत आहे. त्यांच्या या कार्याबदल संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. एम. एस. पवार  यांनी स्टाफच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. यापूर्वी डॉ. आर. डी. कांबळे यांना शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार 2016, समता राष्ट्रीय सम्मान पुरस्कार 2017, उत्कृष्ठ सहायक प्राद्यापक राष्ट्रीय पुरस्कार 2017 असे शैक्षणिक सामाजिक कार्यााबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment