स्वप्नील अनंतराव कदम |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
यश मिळवण्यासाठी मनात उच्य ध्येय असेल तर कोणतीच परिस्थिती आड येत नाही. आईवडील शेतकरी असतानाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालता येथे याची प्रत्यक्ष प्रचिती उत्साळी (ता चंदगड ) येथील स्वप्नील कदम या शेतकऱ्या मुलांने सिद्ध केले. एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या पदांची परीक्षा उत्तीर्ण केल्याने उत्साळीसह चंदगड तालूक्यात स्वप्नीलचे अभिनंदन केले जात आहे.
वडील अनंतराव व आई सुनिता कदम या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नीलचे प्राथमिक १ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण वि. म. उत्साळी येथे तर माध्यमिक शिक्षण रोज ५ किमी चा रस्ता पायदळी तुडवत अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये इ ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण झाले . १२ वी सायन्स करून परत राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून कला विभागातून बी ए पूर्ण केले . बालपणा पासून कष्टाची सवय असणाऱ्या स्वप्नील ने १० वीलाच असताना स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला . आई - वडील व खाजगी कंपनीत काम करणाऱ्या मोठ्या भावाचे मार्गदर्शन घेत घरीच अभ्यास केला . यामध्ये स्पर्धा परीक्षेतूनमागील महिण्यात सहाय्यक सहकार अधिकारी पदी स्वप्नीलची निवड झाली तर आज पुन्हा स्वप्नील नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी वर्ग १ या मध्ये महाराष्ट्र राज्यातून ३३ व्या क्रमाकांने बाजी मारली . एकाच महिन्यात अशा दोन पदावर बाजी मारणारा स्वप्नील ग्रामिण भागातील युवकांसाठी मार्गदर्शक आहे.
स्वप्नील कदम
मी चंदगडी आहे याचा मनामध्ये न्यूनगंड न ठेवता समोर ध्येय ठेवून प्रचंड मेहनत केल्यास यश मिळते. यासाठी चंदगड तालूक्यातील युवकांनी स्वतःला झोकून देवून अभ्यास करावा . प्रामाणिक कष्टच आपले स्वप्न साकार करु शकतात.
No comments:
Post a Comment