अर्जुनवाडी येथे भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2024

अर्जुनवाडी येथे भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       आदर्श मराठा बॉईज व अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) व ग्रामस्थ मंडळ अर्जुनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने खास महाशिवरात्रीनिमित्त दिनांक 9 मार्च २0२४ रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य रस्सीखेच स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक बक्षीस 10001 रुपये, द्वितीय 7001 रुपये, तृतीय बक्षीस 3001 रुपये अशी आहेत. तसेच सर्व विजेते संघांना आकर्षक ढाल व सर्व विजेत्या संघातील खेळाडूंना मेडल आहेत. इच्छूक स्पर्धकांनी  किरण पाटील 8108797839 सुरज पाटील 8286864618 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment