देवरवाडी येथील श्री वैजनाथ मंदिरात आज पासून महाशिवरात्री उत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2024

देवरवाडी येथील श्री वैजनाथ मंदिरात आज पासून महाशिवरात्री उत्सव

 


कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड आणि बेळगाव भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवरवाडी, ता चंदगड येथील श्री वैजनाथ मंदिरात आज गुरुवार दि. ७ रोजी सकाळपासून महाशिवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता अभिषेक होईल. त्यानंतर सर्व भाविकांचे अभिषेक वैयक्तिकरित्या करण्यात येणार आहेत. दि. ८ मार्च रोजी मुख्य यात्रा होईल या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ मार्च रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे. ज्या भाविकांना वैयक्तिक अभिषेक करायचा असेल त्यांनी दि. ७ रोजी रात्री ८ वाजता उपस्थित राहून नंबर लावायचे आहेत. तसेच रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यात्रेसाठी भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या अनुषंगाने  वैजनाथ देवस्थान स्थानिक उपसल्लागार समितीच्या वतीने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा काळातील सर्व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment