गुडेवाडी येथे शिक्षण परिषद उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2024

गुडेवाडी येथे शिक्षण परिषद उत्साहात

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          दाटे केंद्रातील गुडेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत केंद्र स्तरिय ५ वी शिक्षण परिषद केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मुख्याद्यापक  सतुराम होनगेकर यांनी केले. इ.४ थी व इ.७ वी प्रज्ञाशोध सराव संच दिले बद्दल प्राथ. शिक्षक बँकेचे संचालक बाबुराव परीट व विश्वनाथ गावडे  यांचा सत्कार केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक व प्रकाश पाटील  यांचे हस्ते करण्यात आला.

      मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात दाटे केंद्रात प्रथम आले बद्दल वि.मं.बेळेभाट शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा बलांडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग मुळीक यांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय निर्मितीबाबत अभिप्राय याचे मार्गदर्शन केले. तर नागनाथ अडसुळे पायाभूत स्तर अभ्यासक्रम पाठ्यक्रम -२०२३ मसुदा प्रतिक्रिया नोंदवणे याचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शक श्रीमती सुनिता साळुंखे यांनी प्याट (PAT)संकलित चाचणी नियोजन व अंमलबजावणी यांची माहिती दिली. बाल रक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण बाबत वर्षा बलांडे व सौ.रंजिता देसूरकर यांनी मार्गदर्शन केले. नवोपक्रम व उत्कृष्ठ शैक्षणिक व्हीडीओ सादरीकरण याचे मार्गदर्शन केले. आभार श्रीमती रुपाली यादव यांनी केले.

       शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतुराम होनगेकर, बाबुराव परीट, अनंत धोत्रे , शिवाजी गोविंद पाटील, शिवाजी बाबू पाटील, दिनकर तावडे, नागोजी भोसले, अजित शिवणगेकर, कल्पनादेवी नार्वेकर, विलास सुतार यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्रीमती सुनिता साळुंखे  यांनी केले. यावेळी वि. मं. तांबुळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, भरमू पाटील, सौ. मनिषा कांबळे, गजानन कांबळे, विजय चाळूचे, बाबुराव वरपे, केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment