कोवाडच्या राजश्री बेनके व अविनाश बेनके या भाऊ बहिणीचे उज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2024

कोवाडच्या राजश्री बेनके व अविनाश बेनके या भाऊ बहिणीचे उज्वल यश

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       समोर आलेल्या परिस्थितीवर मात करत प्रामाणिक पणे कष्ट केल्यास जीवनात यशस्वी होता येते याची प्रतिची कोवाड (ता. चंदगड) मूळगाव माणगांव येथील राजश्री जानबा बेनके व अविनाश जानबा बेनके या दोन भाऊ बहिणीनी सिद्ध केले.

      आपल्या वडिलांचे बालपणीच अपघाती निधन झाले. अशा परिस्थितीत आईला आधार देत अन हे दुःख उराशी बाळगून शासकीय सेवेत जाण्यासाठी राजश्री व अविनाश सतत धडपडत होते. याचेच फळ म्हणून अविनाश याची रत्नागिरी जिल्हा परिषदे मध्ये मागील आठवडयात शिक्षक म्हणून निवड झाली तर लगेचच स्पर्धा परीक्षा दिलेल्या राजश्रीचा निकालही आज जाहिर झाला. पुणे जलसंपदा विभागात कालवा निरिक्षक म्हणून राजश्रीची निवड झाली. एकाच आठवडयात भाऊ - बहिणीला शासकिय नोकरी मिळण्याची कदाचित महाराष्ट्रातील हि पहिलीच घटना असेल. आज आनंदाच्या या बातम्या समजताच मित्र परिवार व पै पाहुण्यानी राजश्री व अविनाश चे गुलाल उधळून अभिनंदन केले. 

      कोणतेही यश मिळवायचे असेल तर संयम ठेवत सतत कठोर परिश्रम करायला हवेत. गरजेपुरता मोबाईलचा उपयोग करून प्रामाणिकपणे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते असे मत राजश्री बेनके यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment