चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"कॉस्ट अकौंटिंग, लेखापरीक्षण या बाबी उद्योग व्यवसायासाठी तसेच सहकार क्षेत्रासाठी अत्यंत गरजेच्याआहेत." असे प्रतिपादन सोहन कवडे यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट व माडखोलकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी करिअर कौन्सिलचे प्रा. डॉ. एस. डी. गोरल हे होते.
यावेळी बोलताना सोहम कवडे पुढे म्हणाले, "की एखाद्या संस्थेची वित्तीय स्थिती कशी आहे. संस्थेचा व्यावसायिक लाभ कितपत झाला आहे. कोणते तोटे आहेत, प्रक्रिया कशी आहे. या संबंधीची सर्व माहिती कॉस्ट अकाउंटिंग मुळे उपलब्ध होऊ शकते. कॉस्ट अकौंटिंग हे कोणत्याही व्यवसायाला उर्जितावस्था आणून देण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही जाचक अटी नाहीत." अध्यक्षस्थानावरून बोलताना करिअर कौन्सिल अँड गायडन्स चे प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी व्यवसायासाठी मूल्यांकन, पडताळणी, सत्यापन अत्यंत महत्त्वाचे असते. वित्तीय वैधता तपासण्यासाठी कॉस्टअकाउंटिंग महत्त्वाचे ठरते." असे मत व्यक्त केले.
प्रा. एस. के. सावंत यांनी प्रास्ताविकातून" कॉस्ट अकौंटिंग मुळेव्यवसायातील त्रुटी, चुका, लबाडी वेळीच लक्षात येते. समस्या निराकरण करण्याचा मार्ग सापडतो आणि आपला व्यवसाय किंवा उद्योग किफायतशीर पद्धतीने कसा चालवता येईल याविषयीचे अचूक मार्गदर्शन कॉस्ट अकौटिंग मुळे प्राप्त होते." असे मत व्यक्त केले. डॉ. टी. ए. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले. प्रा. युवराज हेरेकर यांच्यासह विद्यार्थ्यी कार्यक्रमास उपस्थित होती.
No comments:
Post a Comment