उत्कृष्ट म्हैस दूध' पुरवठ्यासाठी कालकुंद्री दूध संस्थेस 'गोकुळ' कडून प्रथम पारितोषिक - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2024

उत्कृष्ट म्हैस दूध' पुरवठ्यासाठी कालकुंद्री दूध संस्थेस 'गोकुळ' कडून प्रथम पारितोषिक

'उत्कृष्ट म्हैस दूध' पुरवठ्याबद्दल गोकुळ कडून प्रथम पारितोषिक स्वीकारताना श्रीकृष्ण दूध संस्था कालकुंद्रीचे पदाधिकारी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  कोल्हापूर जिल्हा दूध संघ 'गोकुळ' यांच्याकडून 'उत्कृष्ट म्हैस दूध' पुरवठ्यासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा कालकुंद्री येथील श्रीकृष्ण सह. दूध संस्थेने पटकावला आहे. संस्थेची चंदगड तालुक्यातून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. 

   गोकुळ च्या ६१ व्या वर्धापन दिनी कोल्हापूर येथे रोख रु १० हजार व प्रशस्ती पत्र देऊन गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे, व्हा चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रीकृष्ण दूध संस्थेचे चेअरमन अशोक रामू पाटील, व्हा चेअरमन प्रकाश गणपती कोकितकर, सचिव जयवंत पाटील, भरत मुंगूरकर, मारुती पाटील, शिवाजी नाईक आदींसह संचालक मंडळाने पारितोषिक स्वीकारले.

No comments:

Post a Comment