लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चंदगड शहरात पोलिसांचे पथसंचलन - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2024

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चंदगड शहरात पोलिसांचे पथसंचलन

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरात काढण्यात आलेल्या पतसंचलनात सहभागी झालेले पोलीस, बीएसएफ जवान व होमगार्ड.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   'लोकसभा निवडणूक 2024' नुकतीच जाहीर झाली असून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान 7 मे 2024 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आज दि 23/03/2024 रोजी सायंकाळी 05.00 वाजता  चंदगड शहरात पोलीस विभागामार्फत पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, दोन पोलीस उपनिरीक्षक, बीएसएफ कडील एक वरिष्ठ अधिकारी, दोन दुय्यम अधिकारी, 47 जवान, पोलीस मुख्यालयातील एक  पोलीस उपनिरीक्षक , शहर वाहतूक शाखा कोल्हापूर कडील एक पोलीस हवालदार, चंदगड पोलीस ठाण्यातील 22 अंमलदार व 20 होमगार्ड अशा एकूण 92 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 
   हा रूट मार्च चंदगड पोलीस ठाणे इथून सुरू होऊन ग्रामीण रुग्णालय, छ. संभाजी महाराज चौक, मोहल्ला गल्ली, चंदगड बाजारपेठ, कैलास कॉर्नर, देव रवळनाथ गल्ली , जय भीम गल्ली ते परत चंदगड पोलीस ठाणे या मार्गावरून काढण्यात आला.

No comments:

Post a Comment