बी एड कॉलेजमध्ये जल दिनानिमित्त पथनाट्य स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2024

बी एड कॉलेजमध्ये जल दिनानिमित्त पथनाट्य स्पर्धा



चंदगड : सी एल वृत्तसेवा
  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत महादेवराव बी एड कॉलेज तुर्केवाडी, ता चंदगड येथे जागतिक जल दिनानिमित्त पथनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थापक अध्यक्ष महादेवराव वांद्रे, डी के शिंदे गडहिंग्लज बी एड कॉलेज चे प्राचार्य डॉ. एस एम  रायकर, महादेव बी एड कॉलेज  प्र. प्राचार्य एन जे कांबळे, संचालिका मृणालिनी वांद्रे, ओएस एस आर देशपांडे, विभाग प्रमुख प्रा ग गो प्रधान यांच्या हस्ते झाले.
         कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.एस एम रायकर म्हणाले, 'पाण्याची बचत करणे काळाची गरज बनली आहे. पाणी वाचवलं तरच भविष्यात आपण वाचू. जल दिन आहे म्हणून पाणी वाचवा पाणी आडवा असा संदेश न देता तो आपण दररोज अंगीकरला पाहिजे . 
      यावेळी महादेवराव वांद्रे म्हणाले, शिक्षकाने परिपूर्ण असलं पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षक सुध्दा स्पर्धा परीक्षेद्वारे निवडला जाणार आहे. या स्पर्धेच्या युगात टीकायच असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश मिळवले पाहिजे.
  जागतिक जल दिनानिमित्त भित्तीपत्रिकाचे उद्घाटन, पोस्टर सादरीकरण करण्यात आले. यावेळी पथनाट्य स्पर्धेतील विजेत्या संघाना गौरविण्यात आले. यात  वांद्रे कॉलेज द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक डी के शिंदे बी एड कॉलेज गडहिंग्लज, तृतीय क्रमांक महादेवराव बी एड कॉलेज प्रथम वर्षे यांनी नंबर पटकावले. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण सौ मोनाली परब, व पूजा सुतार यांनी केले.
         यावेळी कॉलेज प्राध्यापक एम आर मुल्ला, एस पी गावडे, मोनाली परब ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा ग गो प्रधान यानी केले.सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले. आभार एन जे कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment