दिल्लीत घुमला चंदगडी बोलीचा गजर, चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने प्राध्यापक रामदास बिर्जे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2024

दिल्लीत घुमला चंदगडी बोलीचा गजर, चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने प्राध्यापक रामदास बिर्जे यांचा सत्कार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगडी बोली भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. दिल्ली येथे साहित्य अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमात चंदगडी बोलीतून कविता सादरीकरण करण्याची संधी कवी प्रा रामदास बिर्जे यांना देण्यात आली . प्रा. रामदास बिर्जे यांना यासाठी निमंत्रित केले होते. १४ मार्चला त्यांनी आपली कविता सादर केली.

    साहित्य अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्त ११ ते १६ मार्च या काळात साहित्य उत्सव होता. यामध्ये एक हजारहून अधिक लेखक, तत्त्वज्ञ, विश्लेषक यांच्यासह १७५ हून अधिक बोलीभाषेतील लेखक, कवी सहभागी झाले होते. नवी दिल्ली येथील 'रवींद्र भवन' मध्ये हा उत्सव संपन्न झाला. दरम्यान, या कार्यक्रमात चंदगडी बोलीचाही समावेश करण्यात आला होता. प्रा. बिजें १४ यांनी तारखेला चंदगडी बोलीतून कवितांचे सादरीकरण केले. हिच कविता पुन्हा हिंदीमधूनअनुवादित करून सादर कराण्यात आली. चंदगडी बोलीचे

        स्वतंत्र अस्तित्व मानले जाते.गेल्या काही वर्षांत ही भाषा आपली वैशिष्टयपूर्ण ओळख घेऊन पुढे येत आहे. साहित्य अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त हो ओळख आणखी स्पष्ट झाली आहे

      साहित्य अकाद‌मीच्या कार्यक्रमात आपल्या बोली भाषेचा समावेश होणे ही तमाम चंदगडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने चंदगडी बोली राष्ट्रीय पातळीवर भाषा तज्ज्ञांचे लक्ष वेधणार आहे.असे मत चंदगडी बोली भाषेचे अभ्यासक- प्रा. डॉ. नंदकुमार मोरे,व्यक्त केले आहे. चंदगडी बोली भाषेचा डंका दिल्ली दरबारी गाजवल्याबद्दल चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने प्राध्यापक रामदास बिरजे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी मराठी अध्यापक संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एम एन शिवनगेकर ,एम व्ही पाटील ,संजय साबळे, व्ही एल सुतार ,एच आर पाऊसकर ,राजेंद्र शिवणगेकर, बी . एन पाटील , तालुका संघाचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह प्राध्यापक बिरजे यांचे आई-वडील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment