तृतियपंथी यांना एस. टी. बसच्या प्रवाशी तिकीटांमध्ये सवलत द्यावी, मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2024

तृतियपंथी यांना एस. टी. बसच्या प्रवाशी तिकीटांमध्ये सवलत द्यावी, मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

 


गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र ऐक जोगाती पंरपरा आहे. तृतिय पंथी हा पहिला माणूस आहे. कायदयाने व्यक्ती स्वातंत्र दिले आहे. त्या ही आर्ध्या महिलाच आहेत. पण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे महिलांप्रमाणे त्यांनाही एस. टी. तिकीटामध्ये सवलत द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी यांना दिले आहे. 

        तृतियपंथी यांच्या हातात ठोस काम नाही म्हणून हि लोक भिक मागणे, नाचणे आणि लोकांनी हि त्यांच दैवीकरन केले आहे. त्यांना माणूस म्हणून स्विकारायला तयारच नाहीत. पण देव म्हणून स्विकारायला तयार आहेत. यांचे हावभाव स्त्री सारखेच असतात. ते साडी नेसुन साज श्रृंगार करतात. आज महाराष्ट्र राज्यात महिलांना एस. टी. ला आर्धा तिकीट आहे. मग या तृतीयपंथीना का नाही. कारण त्या ही आर्ध्या महिलाच आहेत. ते महिलांच्याच जास्त वावरतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने विचार करून या तृतीय पंथीयांना एस.टी. बस चे तिकीटात सवलत देवून त्यांना महिलांच्या बरोबरीने अर्धे तिकीट करावे. अन्यथा पुढील वेळी सर्व तृतीयपंथी यांना एक घेवून मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या उपजिल्हा अध्यक्ष श्रीमती अनिता पाटील यांनी दिला आहे.  


No comments:

Post a Comment