कोवाड / सी. एल. वृत्तसेवा (संजय पाटील)
राजगोळी खुर्द - चंनेहट्टी (ता. चंदगड) येथील ओलम ग्लोबल अग्री कमोडीटीज इंडिया प्रा. लि.या साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या १४ व्या गळीत हंगामाची सांगता झाली. या हंगामात कारखान्याने ६ लाख ४१ हजार मे.टन उसाचे विक्रमी गाळप करून गडहिंग्लज विभागात आघाडी घेतली.
याबरोबरच सर्व तांत्रिक निकषांमध्येही कारखाना अग्रेसर असून यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यात जावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व वाहतूक यंत्रणेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते, दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखाना प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून एफआरपी पेक्षा जादा रक्कम देऊन शेतकरी हाच ओलम कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे व कारखाना प्रशासन, कामगार,ऊस उत्पादक दार, तोडणीदार, वाहतूकदार या सर्वांच्या सहकार्याने यंदाच्या गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पडला असून विक्रमी उसाचे गाळप केले असल्याची माहिती यावेळी बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
सांगता कार्यक्रमामध्ये सत्कार करताना बिझनेस हेड भरत कुंडल |
बिझनेस हेड भरत कुंडल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्य शेती अधिकारी दत्तराज गरड,कामगार युनियन अध्यक्ष संतराम गुरव, एच आर चे शशांक शेखर यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.
उपस्थित ऊस पुरवठा शेतकरी |
यावेळी हंगाम अखेर पर्यंत तोडणी व वाहतूक केलेल्या तोडणीदार आणि वाहतूकदार यांचा सत्कार भरत कुंडल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी एच.आर. निता लिंबोरे, ऊस पुरवठा अधिकारी अनिल पाटील, जयदीप जैन, शशांक शेखर, विनोद यनकना, राजू निर्मले, कामगार युनियन सचिव रवळनाथ देवण, बेलवी, अनिगेरी, विलियम कारवालो, रणजित सरदेसाई, भागोजी लांडे, या शेतकऱ्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक शेतकरी, कारखान्याचा शेती विभाग, कामगार, ऊस तोडणीदार, वाहतूकदार, ठेकेदार यांनी उपस्थिती लावली होती.
प्रास्तविक अनिल पाटील यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सतीश कागणकर यांनी केले.
No comments:
Post a Comment