वीना मोबदला जमीन देणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करताना ग्रामस्थ.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
उत्साळी (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी, माजी उपसरपंच खंडेराव देसाई यानी अलबादेवी गावासाठी नव्याने मंजूर झालेल्या पाणी योजनेसाठी आपल्या मालकीची नदीकाठी असलेली एक गुंठा जमिन जॅकवेल बांधण्यासाठी विनामोबदला देऊन अलबादेवी ग्रामस्थांची मोठी अडचण दूर केली. त्यांच्या या औदार्याबद्दल खंडेराव देसाई यांचा अलबादेवी ग्रामस्थांकडून काल ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
खंडेराव देसाई यांचे वडील उस्ताळी गावचे तत्कालीन सरपंच कै राजाराम श्रीपतराव देसाई यांनी देखील २५ वर्षापूर्वी अलबादेवी येथील मराठी शाळेसाठी विनामोबदला सहा ते सात गुंठे जागा दिली होती. या ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या शाळेची सुसज्ज इमारत उभी आहे. सामाजिक दातृत्व असलेल्या उत्साळीच्या देसाई कुटूंबियांचा आदर्श आजच्या युगात प्रेरणा देणारा आहे.
यावेळी केरुशेठ कोले, तंटामुक्त अध्यक्ष धोंडीबा घोळसे, श्रीकांत नेवगे,उपसरपंच राजाराम पाटील, तानाजी कोंडूसकर, सिद्राम पवार, रामभाऊ पाटील, संजय पाडले, वैभव डांगे, दिनकर कोले, जानबा कोडूसकर, लक्ष्मण पाटील, परशराम चौकुळकर, राजाराम देवळे आदीसह उपस्थित होते.
No comments:
Post a Comment