चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मौजे कार्वे (ता. चंदगड) शाळेचे माजी विद्यार्थी व सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे चे सेवानिवृत्त प्राध्यापक बी आर फर्नांडीस व त्यांच्या सौभाग्यवती फिलिप्स रेडिओ कंपनीच्या सेवानिवृत्ती कर्मचारी मारिया फर्नांडिस या दांपत्याने शाळेस वीस हजार रुपयांची रोख देणगी दिली. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपण काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही देणगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कालकुंद्रीकर यांच्याकडे सुपूर्द केली. या देणगीतून शाळेतील जे विद्यार्थी अभ्यास व क्रीडा क्षेत्रात नंबर पटकावतील त्यांचा सन्मान केला जाणार आहे. नियमित येणाऱ्या बातम्यांमधून शाळेचा वाढलेला लौकिक, यशस्वी घोडदौड व प्रगती विषयी वाचून समाधान वाटते असे गौरवोद्गार प्रा फर्नांडिस यांनी यावेळी काढले. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष नामदेव पाटील, सरपंच जोतिबा आपकेे, शिक्षक गोपाळ शेटीये, शिवाजी येळळूरकर, सट्टूप्पा लोहार व विद्यार्थी उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सीमा नांदवडेकर मॅडम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment