कालकुंद्री परिसरात होळी- धुलीवंदन व रंगोत्सवाची धूम - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2024

कालकुंद्री परिसरात होळी- धुलीवंदन व रंगोत्सवाची धूम

कालकुंद्री येथे धुलीवंदन निमित्त रंगात लावून निघालेली तरुणाई.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       कालकुंद्री (ता. चंदगड) परिसरात होळी- धुळवड सण पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. काल सायंकाळी श्री कलमेश्वर मंदिर व श्री ब्रह्मलिंग मंदिर समोर पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीने आणून होळी खूट उभे करण्यात आला. यानंतर होळी पेटवण्यात आली. ब्रह्मलिंग मंदिर येथे यादव गल्ली 'अ' मार्फत शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
    

     दुसऱ्या दिवशी धुळवड- धुलीवंदन साजरा करण्यात आला. यावेळी आबाल वृद्धांनी रंगोत्सवात सहभाग घेऊन रंगांची उजळणी केली. यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सह सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. कालकुंद्री येथे २०-२५ वर्षांपूर्वी रंगोत्सवा ऐवजी धुलीवंदन दिवशी स्लोसायकलिंग, डोळे बांधून नारळ फोडणे, बादलीत चेंडू फेकणे, पाण्यामध्ये ठेवलेल्या वाटीत नाणे टाकणे, सायकल चालवत वर बांधलेले केळे खाणे, नेमबाजी असे अंगभूत कौशल्याला चालना देणारे अनेक मनोरंजक खेळ खेळले जात. रंगांची उधळण व हुल्लडबाजीमुळे हे खेळ सध्या इतिहास जमा झाले आहेत. परिसरातील इतर सर्व गावांतही होळी धुलीवंदन सण पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment