घटप्रभा नदीत उडी घेऊन एकाची आत्महत्या..! कानूर स्टॉपवर बस मधून उतरून मारली नदीत उडी - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2024

घटप्रभा नदीत उडी घेऊन एकाची आत्महत्या..! कानूर स्टॉपवर बस मधून उतरून मारली नदीत उडी

संग्रहित छायाचित्र 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      कानूर खुर्द (ता. चंदगड) नजीक घट्टप्रभा नदीत उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज 24 मार्च 2024 रोजी दुपारी 12.40 ते 4.30 च्या सुमारास घडली. मयताचे नाव राकेश रवी पानेरी, वय 34 वर्षे, मुळ गाव संगरगाळी, पो. गुंजी, ता. खानापूर, जि. बेळगाव (कर्नाटक), सध्या राहणार शिरगाव, ता. देवगड, जि सिंधुदुर्ग असे आहे. घटनेची वर्दी राजेश रवी पानेरी, वय 38 वर्षे, व्यवसाय गंवडी काम मु. संगरगाळी पो. गुंजी ता. खानापुर जि- बेळगाव, राज्य कर्नाटक, सध्या रा. शिरगाव, ता. देवगड, जि सिंधुदुर्ग यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
 याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली हकीकत अशी, यातील मयत राकेश रवी पानेरी हा दारुचा व्यसनी होता. त्याची गेले दोन दिवसा पासुन मानसिक स्थिती बिघडल्यामुळे तो तोंडातल्या तोंडात बडबडत होता. यातील वर्दीदार व मयत राकेश हे दोघे शिरगाव (ता. देवगड जि सिंधुदुर्ग) येथुन बसने त्यांचे मुळ गावी संगरगाळी, येथे जात असताना त्यांची बस कानुर खुर्द ता. चंदगड येथे बस स्टॉपवर थांबली असताना यातील मयत हा बसमधून उतरून रस्त्याने पळत जाऊन त्याने घटप्रभा नदीचे पात्रात उडी मारली. यात त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. वर्दी नंतर चंदगड पोलिसांनी मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचे आदेशान्वये पो.हे. कॉ 399 देसाई करीत आहेत.

No comments:

Post a Comment