केंद्रप्रमुख शामराव पाटील यांचेकडून कालकुंद्री हायस्कूल व प्राथमिक शाळेस तिजोरी व प्रिंटर - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2024

केंद्रप्रमुख शामराव पाटील यांचेकडून कालकुंद्री हायस्कूल व प्राथमिक शाळेस तिजोरी व प्रिंटर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) चे सुपुत्र व तुडये केंद्राचे केंद्रप्रमुख शामराव सिध्दाप्पा पाटील यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्ताने कालकुंद्री येथील केंद्रीय प्राथमिक शाळेस अद्ययावत प्रिंटर तर श्री सरस्वती विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन लोखंडी तिजोरी कपाटे भेट दिली. ते ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

     ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून त्यांनी शाळांना मदत केली. त्यांनी सेवानिवृत्ती निमित्त राबवलेल्या या उपक्रमाचे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे. कालकुंद्री बरोबरच तालुक्यातील इतरही  शाळांना त्यांनी विविध वस्तू देणगी स्वरूपात दिल्या आहेत. केंद्र शाळा कालकुंद्री येथे प्रिंटर प्रदान कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, विजय कोकितकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर, मुख्याध्यापक मोहन गाडीवड्डर, दस्तगीर उस्ताद, ए के पाटील, मनोहर नाईक, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. सरस्वती विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी शामराव पाटील यांनी मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर यांच्याकडे दोन कपाटे सुपूर्द केली. यावेळी अध्यापक डी एम तेऊरवाडकर, ई एल पाटील, जोतिबा पाटील,   सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विनायक कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment