चंदगड / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांनी दिलेला समतेचा,पुरोगामी विचार हा दिल्ली दरबारी पोहचायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता 'जनतेनंच ठरवलंय' असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी लोकसभेत श्रीमंत शाहू महाराज यांना निवडून देण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन केले. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत चंदगडच्या जनतेनं भरघोस मताधिक्य देवून जो विश्वास दाखवला होता, त्यामुळेच या दौऱ्याची सुरुवात चंदगडपासूनच केल्याचे संभाजी राजेंनी काल चंदगड येथे सांगितले. महाविकास आघाडीकडून (इंडिया) श्रीमंत शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास निश्चित समजून चंदगड येथून सुरुवात केली.काल माजी खासदार संभाजी राजे यानी चंदगड दौऱ्याची सुरुवात करण्याअगोदर चंदगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेतले. येथे ,रवळनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव सुरेश सातवणेकर यांनी संभाजी राजे यांचा सत्कार केला.
संभाजीराजे म्हणाले की, श्रीमंत शाहू महाराज हे अजातशत्रू,अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व आहे. त्यांना राजकारणापलीकडे जावून कोल्हापूरचा विकास करायचा आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.यावेळी प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते मंडळी,कार्यकर्ते यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या व त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंदगड तालुक्यात शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रचाराची यंत्रणा कामाला लागली असून निश्चितच शाहू महाराज हे खासदार होतील असा विश्वास गोपाळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अडकुर येथे दौलतचे माजी संचालक बाबासाहेब अडकुरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, भैरू खांडेकर, जी. बी. पाटील, युवा नेते विक्रम चव्हाण पाटील राजू रेडेकर, विक्रम मुतकेकर यांच्यासह चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकऱ्यांची भेट घेतली. या प्रसंगी, स्वराजचे जिल्हाध्यक्ष संजय पोवार, महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशिलकर, विद्याधर गुरबे, नंदकुमार ढेरे, शंकरराव मनवाडकर, लक्ष्मण मनवाडकर, मल्लिकार्जुन मुगेरी, अशोक जाधव, संजय पाटील, विष्णू गावडे, विशाल पाटील, विक्रम मंडलिक, देवाप्पा बोकडे, अशोक कदम, शंकर ओऊळकर, संदीप नांदवडेकर, अभिजित गुरबे, माधव अडकुरकर यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भरमूअण्णा पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
या दौऱ्यात संभाजीराजे यांनी बसर्गे येथे माजी राज्यमंत्री व भाजप नेते भरमुअण्णा पाटील यांच्या घरी देखील सदिच्छा भेट दिली. यावेळी गोकुळचे माजी संचालक दीपक दादा पाटील, माजी महिला बाल कल्याण सभापती ज्योतीताई पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच तुकाराम काबळे, तुकाराम बेनके, एकनाथ बसर्गेकर, मारुती कुट्रे, हरिभाऊ पाटील, डाॅ. नामदेव कुट्रे, अमित वर्पे, जानबा चव्हाण आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीने संभाजी राजे पक्ष, गटातटाच्या पलीकडे जाऊन सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment