दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत शिवणगे शाळेला लॅपटॉप प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2024

दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत शिवणगे शाळेला लॅपटॉप प्रदानचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
    दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई, कोल्हापूर, बेळगाव यांच्या वतीने मराठी विद्या मंदिर शिवनगे ता. चंदगड या प्राथमिक शाळेस लॅपटॉप प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोतिबा मुंगारे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय काँग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते.
  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती चिगरे यांनी स्वागत केले. शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवनगे शाळा  इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत असून विविध स्पर्धा परिक्षेत सातत्याने सहभाग घेऊन यश मिळवण्यात अग्रेसर आहे. याची दखल घेत राज्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या गडकिल्ल्यांची काळजी घेणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी, दुर्गम भागातील मुलं आधुनिक जगाच्या प्रवाहात यावीत म्हणून लॅपटॉप देणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे हे सामाजिक कार्यही तितकेच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन यावेळी बोलताना गोपाळराव पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना चंदगड तालुक्यातील गड किल्ल्यांच्या संगोपनासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानने हाती घेऊन सुरू केलेल्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली.
 यावेळी शिक्षक संघटना पदाधिकारी गणपत स पाटील, सायनेकर नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनानिमित्त अध्यापिका चिगरे, उपस्थित महिला व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दोन्ही दुर्गवीर प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख कृष्णा सुप्पल, भगवंत निवगिरे, संजय करडे, विशाल पन्हाळकर आदींसह व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा छाया सांबरेकर, उपसरपंच सुमन सांबरेकर, सदस्य मंदार पाटील, पंकज पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य. सहाय्यक शिक्षक एस.के.कांबळे सर उपस्थित होते.  मोहन पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment