कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह' दि १४ रोजी प्रारंभ २१ रोजी समाप्ती - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2024

कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह' दि १४ रोजी प्रारंभ २१ रोजी समाप्ती



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा 'अखंड नाम सप्ताह' आज गुरुवार दि. १४ मार्च रोजी प्रारंभ झाला. संपूर्ण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या 'अखंड नाम सप्ताह' चे यंदा सलग ९५ वे वर्ष आहे. 
        दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमी सूर्योदय ते फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत सलग सात दिवस मंदिरात "सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब" नामस्मरणाचा अखंड गजर चालणार आहे. सप्ताह काळातील ७ दिवस रोज सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ, ७ ते ८ प्रजापिता ब्रह्माकुमारी यांचे प्रवचन, रात्री ९ ते १२ भागवताचार्य ह भ प संतोष महाराज बुरकुल, रा संभाजीनगर यांचे कीर्तन, रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत परिसरातील भजनी मंडळांचे जागर भजन,  दुपारी १२ ते सायंकाळी ४ महिला भजनी मंडळाचे भजन असेल. कीर्तनासाठी प्रवीण घुगे (सिंध वादक) गजानन महाराज (तबलावादक) दीपक महाराज (बॅन्जो वादक) कृष्णा आगलावे (सुरावटी वादक) यांची साथ असेल. नवसाच्या मुलांचे तुला दान (मुलांना जोखणे) बुधवार दि. २० रोजी सकाळी ११ ते सायं. ६ पर्यंत चालणार आहे. सप्ताहाची सांगता गुरूवार दि. ४ मार्च रोजी होणार असून या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी  रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व श्रुंगारवाडी (ता. आजरा) येथील महादेव प्रसादिक मंडळाच्या  सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी सप्ताह काळातील सर्व कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन अखंड नाम सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment