आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कालकुंद्री येथे ६७ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2024

आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कालकुंद्री येथे ६७ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ

कालकुंद्री येथे कालकुंद्री ते किटवाड रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील सोबत ग्रामस्थ व कार्यकर्ते

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५७ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ रविवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
     यावेळी त्यांच्या फंडातून पूर्ण झालेल्या १० लाख रुपयांच्या चक्कर लाईन काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. शुभारंभ झालेल्या कामात कालकुंद्री- किटवाड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण- ४० लाख, मुस्लीम समाज मशीद सुशोभिकरण- १० लाख, विठ्ठल- रखुमाई मंदिर समोरील रस्ता भरावसह कॉंक्रीटीकरण- ७ लाख या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील असे सांगण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्यासह कालकुंद्रीच्या सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य विलास शेठजी, प्रशांत मुतकेकर, विनोद अशोक पाटील, गुरुनाथ पाटील, शिवाजी कोकितकर, दिनकर पाटील, अशोक पाटील, शरद जोशी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत आलेल्या होसूर, कागणी, कुदनूर, तळगुळी, किटवाड आदी गावातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment