तुकाराम हरेर यांची इब्राहीपुरच्या सरपंचपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2024

तुकाराम हरेर यांची इब्राहीपुरच्या सरपंचपदी निवड

 

तुकाराम लक्ष्मण हरेर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी तुकाराम लक्ष्मण हरेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अमर पाटील होते. सरपंच पदासाठी सदस्य गणपती पाणोरे यानी तुकाराम हरेर यांचे नाव सुचवले. याला सर्वांनी अनुमती दिल्याने सरपंचपदी तुकाराम हरेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

                यावेळी ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच निळकंठ देसाई, सौ नमिता सावंत, सौ. रंजना परिट, सौ. जयश्री सुपल, सौ. रूपाली सुतार यांच्यासह शिवाजी हरेर, दत्तात्रय देसाई, विजयसिंह देसाई, विलास नार्वेकर, विष्णू दळवी, चंद्रकांत सावंत, सहदेव हरेर, तुकाराम पाणोरे' अजित देसाई ग्रामविकास अधिकारी संतोष खोचगे, तलाठी श्री मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक करून शिवाजी हरेर यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment