कोवाड केंद्र शाळेची प्रज्ञाशोध परीक्षेत भरारी, तालुकास्तरीय टॉप 36 मध्ये 11 विद्यार्थी - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2024

कोवाड केंद्र शाळेची प्रज्ञाशोध परीक्षेत भरारी, तालुकास्तरीय टॉप 36 मध्ये 11 विद्यार्थी

केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड शाळेतील प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

      केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) या शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत आपली घोडदौड यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या पाच वर्षात शाळेने क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक, स्पर्धा प्रज्ञाशोध सह अन्य परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. ही परंपरा विद्यार्थ्यांनी यावर्षीही पुढे सुरू ठेवली.

वर्गशिक्षिका मधुमती गवस यांचे अभिनंदन करताना केंद्रप्रमुख शिरगे व केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक 


    यंदाच्या प्रज्ञाशोध परीक्षेत चंदगड तालुक्यातील टॉप टेन मध्ये 2 विद्यार्थी, टॉप ट्वेंटी फाईव मध्ये 5 विद्यार्थी तर टॉप फिफ्टी मध्ये 4 अशा 11 विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे इयत्ता 4 थी (अ) 1) आचल अनिल भोगण (174) तालुक्यात 9 वी, 2) कु. सोहम महेश कोरी (172) तालुक्यात 10 वा, 3) कार्तिक राजेंद्र पाटील(164) तालुक्यात 14 वा, 4) आरव दीपक पत्ताडे (146) तालुक्यात 23 वा, 5) नेहा नरसू वांद्रे (140) तालुक्यात 26 वी, 6) स्वरांजली रामा कुट्रे (134) तालुक्यात 29 वी, 7) अहमद फिरोज शेख (132) 30 वा, 8) कु.रुपल गोपाळ कांबळे (120) 36 वी या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मधुमती गुंडू गावस यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय इयत्ता 4 थी (ब) वर्गातील 1) रसिका गुरुप्रसाद तेली (166) तालुक्यात 13 वी, 2) आरोही पराग भोसले (162) तालुक्यात 15 वा, 3) खनसा राजेसाब अत्तार(144) तालुक्यात 24 या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक गणपती काशीराम लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

      विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे या वर्गातील विद्यार्थी पहिली व दुसरीच्या अभ्यासाला वंचित राहिले होते. तरीही शाळेतील मधुमती गावस मुख्याध्यापक गणपती लोहार यांच्यासह अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, भावना अतवाडकर, जयमाला पाटील आदी शिक्षकांनी परिश्रमपूर्वक अध्यापनाचे कार्य केल्यामुळे हे यश दिसून आले. तालुक्यात किंबहुना जिल्ह्यात बहुतांशी शाळांत दरवर्षी पटसंख्या कमी होत असताना केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे इयत्ता पहिली ते चौथीची पटसंख्या जी 2018 मध्ये 125 होती ती दरवर्षी वाढ होत असून 180 पर्यंत पोहोचली आहे. याचे श्रेय शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे लागेल. 

      यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव, सर्व सदस्य व केंद्रप्रमुख बी एस शिरगे आदींचे प्रोत्साहन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पालक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment