जक्कनहट्टी शाळेत सत्कार प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पाटील, यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्रीकांत पाटील व मान्यवर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अतिदुर्गम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जक्कनहट्टी गावची कन्या कु प्रियांका शांताराम पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी (PSI ) निवड झाली आहे.
गावातील एक शिक्षकी शाळेत शिकून तिने केलेली प्रगती निश्चितच तालुक्यातील तरुण- तरुणींना दिशादर्शक ठरणारी आहे. या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरज पाटील, सदस्य राणबा प्रधान, धोंडिबा प्रधान, युवराज प्रधान, मोहन प्रधान, नरसू पाटील, राजाराम पाटील अंगणवाडी सेविका, मदतनीस, लता प्रधान, महिला ग्रामस्थ, पेंटर सदानंद कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रियांका पाटील यांनी आपली यशोगाथा उपस्थित चिमुकले विद्यार्थी व पालकांच्या समोर व्यक्त केली.
No comments:
Post a Comment