गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला काॅन्स्टेबल दोन हजार रूपये लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2024

गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला काॅन्स्टेबल दोन हजार रूपये लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 

चंदगड / प्रतिनिधी 

       गडहिंग्लज येथील एका दाम्पत्यावर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई थांबविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडहिंग्लज ठाण्यातील पोलिस महिला रेखा भैरु लोहार यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी लोहार यांनी २ हजार रुपये मागितले. ही रक्कम स्विकारताना विभागाने ठाण्यातच रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उपअधिक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक असमा मुल्ला यांनी कारवाई केली. रेखा लोहार यांनी चंदगड व आजरा पोलिस ठाण्यातही सेवा बजावली आहे.


No comments:

Post a Comment