तेऊरवाडी कुस्ती आखाड्यात कोल्हापूरच्या सुरज मुंडेची उदयराजे पाटीलवर डंकी डावावर मात, महिला कुस्ती पट्टूचाही सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2024

तेऊरवाडी कुस्ती आखाड्यात कोल्हापूरच्या सुरज मुंडेची उदयराजे पाटीलवर डंकी डावावर मात, महिला कुस्ती पट्टूचाही सहभाग

 

तेऊरवाडी कुस्ती आखाड्यातील प्रथम कमांकाची लढत पै सुरज मुंडे व पै. उदयराजे पाटील यांच्यात चालू असतानाचा क्षण

तेऊरवाडी / एस. के. पाटील

      श्री राम नवमि निमित्य तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे तेऊरवाडी ग्रामस्थ व श्रीराम तालिम मंडळ यांच्या वतीने आयोजित कुस्ती आखाड्यात ७० हून अधिक लहानमोच्या कुस्त्या झाल्या. शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरच्या सुरज मुंडे याने मोतीबाग तालिम कोल्हापूरच्या उदयराजे पाटील उर्फ टायसन वर २७ व्या मिनिटामध्ये डंकी डावावर विजय संपादन करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस जिंकले. विशेष म्हणजे या कुस्ती आखाड्यात महिला कस्ती मल्लांनिही चमकदार कुस्त्या केल्या.

विजयी मल्ल पै सुरज चा सन्मान करताना मान्यवर

      सुरवातीला फोटो पूजन व आखाडा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्या नंतर कुस्त्याना सुरवात झाली. एक नंबरची कुस्ती  २७ मिनिटे रंगली दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकिनांना या कुस्ती चा बराच वेळ आनंद लुटता आला. यामध्ये सुरज मुंडेने बाजी मारली.

दुसऱ्या नंबरची कुस्ती गणेश मुंडे (कोल्हापूर) याने किर्ती कुमार बेनके (कंग्राळी) याला आस्मान दाखवत जिंकली . कपटे पिरान च्या सुनिल करवते याने शिनोळी च्या विक्रम ला पराजित करून तिसरा नंबर मिळवला . चौथा कोल्हापूर शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस मोरे याने मिळवला . तर पाचव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) व ऋषीकेश पाटील (शाहूपुरी) कोल्हापूर  यांच्यात रंगतदार  झाली . गुणावर ऋषीकेश विजयी झाला .

मेंठ्यासाठी तुल्यबळ लढत तेऊरवाडीचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शुभम पाटील व कर्नाटक चॅम्पीयन मल्ल पार्थ ( कंग्राळी ) यांच्या मध्ये झाली .यांमध्ये शुभमने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारने फेडत पार्थ ला चितपट करत मेंढा जिंकला .

अन्य विजयी मल्ल असे - पवन चिकदीनकोप (बेळगाव) विनायक वास्कर (कोल्हापूर) विक्रम गावडे (तुर्केवाडी) अध्ययन एडके (कवटेपिरान) हणमंत (भांदूर गल्ली) कुलदिप (राशिवडे) सिद्धार्थ (तिर्थकुंडे)  सतबा (तेऊरवाडी) रोहण मेणसे (तेऊर वाडी) मूलीमध्ये ऋतूजा रावळ (बेळगाव) श्रावणी (किणी) प्रगती (तेऊरवाडी) शर्वरी गणाचारी (किणी) समिक्षा (यळूर ) समिक्षा धामणेकर आदिनी कुस्ती मध्ये सदभाग घेऊन आपली मत्ल कला दाखवली.

कवठेपिराचे कुस्ती निवेदक रामदास गायकवाड यानी कुस्ती निवेदन केले तर एम ए पाटील व एन व्ही पाटील यानी सूत्रसंचालन केले .

या आखाड्याचे पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशिलकर , पै लक्ष्मण भिंगुडे , पै प्रकाश दळवी , पै महादेव पाटील , पै सुबराव पाटील पै राजाराम पाटील आदिनी काम पाहिले . तर हलगी सम्राट म्हणून निळपण चे रविंद्र साळवी यानी सर्वांना मंत्रमुग्ध केले . या आखाड्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व कर्नाटक महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती.

No comments:

Post a Comment