अर्जुनवाडी येथे माजी विद्यार्थ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2024

अर्जुनवाडी येथे माजी विद्यार्थ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना श्रेया सुतार , स्वरा मंडलिक ' सई पाटील व इतर
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
            अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनी चा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ माजी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला.  माजी विद्यार्थी संघटनेमध्ये नवीन सदस्य झालेल्यांच्या  हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्याना बक्षीस देण्यात आले.        यामध्ये कु. आकांक्षा विनायक नाईक या विद्यार्थिनीने  ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ, नेसरी येथे चौथा क्रमांक मिळवून प्रशस्तीपत्र धारक झाली. तसेच कुमार स्वराज सागर कांबळे याने राज्य स्तरीय ऋणानुबंध परीक्षेत १०० पैकी ८४ गुण मिळवून गडहिंग्लज तालुक्यात तिसरा क्रमांक व वेद परीक्षेत १०० पैकी ७८ गुण मिळवून प्रशास्तीपत्रधारक झालेबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे संघटनेकडून कौतुक करण्यात आले.                                        हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे नवीन सदस्या कु. स्वरा मंडलिक, कु. श्रेया सुतार, कु. सई पाटील, कु.संस्कृती गोळसे, कु. अस्मिता नाईक  तसेच संघटनेचे कार्यकारिणी (सदस्य) विनायक नाईक,(सचिव )अनिकेत पाटील,सागर कांबळे यानी प्रयत्न केले . No comments:

Post a Comment