पाटणे फाटा येथे रविवारी मोफत संपूर्ण मूत्ररोग निदान शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2024

पाटणे फाटा येथे रविवारी मोफत संपूर्ण मूत्ररोग निदान शिबिर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       कार्वे, पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयात रविवारी (दि. 21) मोफत संपूर्ण मूत्ररोग निदान शिबिर आयोजित केल्याची माहिती बेळगाव येथील मूत्ररोग तज्ञ डॉ. अमेय पठाडे यांनी दिली. 

      सदर शिबिर हे मोफत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात मूत्रखडा, प्रोस्टेट ग्रंथी, लहान मुलांचे लघवी संबंधित आजार तसेच महिला व पुरुषांच्या आजारांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात रुग्णांच्या लघवीच्या धारेची तपासणी मोफत करण्यात येईल. सदर शिबिर सकाळी दहा ते चार यादरम्यान होणार असून गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबिर कार्वे, पाटणे फाटा येथील  तिलारी रोडवरील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयात होणार आहे.

No comments:

Post a Comment